पाकव्याप्त काश्मीरमधील जिहादी आतंकवादी वारसा हक्कातून मिळालेली संपत्ती विकून करत आहेत अर्थपुरवठा !
प्रशासकीय अधिकारी करत आहेत साहाय्य !
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमधील जिहादी आतंकवाद्यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये आश्रय घेतला आहे. असे असले, तरी ते त्यांची काश्मीर खोर्यातील वारसा हक्कातून मिळालेली संपत्ती विकत असून त्यातून मिळालेली रक्कम आतंकवादी संघटनांसाठी उपलब्ध करून देत आहेत.
काही वर्षांपूर्वीपर्यंत शेकडो काश्मिरी तरुण जिहादी आतंकवादाच्या प्रशिक्षणासाठी पाकिस्तान आणि पाकव्यप्त काश्मीर येथे जात होते. त्यांची संपत्ती काश्मीर खोर्यात आहे. महसूल अधिकारी आणि नातेवाइक यांच्या साहाय्याने ही संपत्ती आता विकली जात आहे. त्यातून आलेले पैसै काश्मीर खोर्यातील आतंकवादी संघटना, तसेच पाकिस्तान किंवा पाकव्यप्त काश्मीर येथील आतंकवादी यांना दिली जाते. अशा काही मालमत्ता अधिकार्यांच्या साहाय्याने अवैध पद्धतीने विकल्याचे दिसून आले आहे. संपत्ती विकण्यास साहाय्य करणारे महसूल अधिकारी, नातेवाईक आणि अन्य यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. सरकारने अशा काही संपत्तीची विक्री आणि हस्तांतरण यांवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे.
संपादकीय भूमिकाकाश्मीरमधील प्रशासनामध्ये जिहादी आतंकवाद्यांचा भरणा असेल, तर तेथील आतंकवाद नष्ट कसा होणार ? काश्मीरमधील जिहादी आतंकवाद समूळ नष्ट करण्यासाठी तेथील प्रशासन ‘आतंकवादप्रेमी’ मुक्त करा ! |