उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावे, असे का वाटणार नाही ? – खासदार संजय राऊत, शिवसेना

मुंबई – उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र येतील का ? हे येणारा काळ ठरवेल. ते आमचेच सहकारी आहेत. इतकी वर्षे आम्ही काम केले आहे. ते एकत्र यावेत, असे का वाटणार नाही ?, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे ट्वीट केले आहे. या ट्वीटविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलतांना संजय राऊत यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ‘दीपाली सय्यद अभिनेत्री आहेत. पक्षाचे काम करतात. त्यांना असे ट्वीट करण्याचे अधिकार कुणी दिले ?’ अशा प्रश्नही या वेळी राऊत यांनी उपस्थित केला.