गोफण (रायगड) येथे गोहत्या करणारी टोळी अटकेत !
रोहा (रायगड) – तालुक्यातील गोफण गावाच्या डोंगराळ भागात गायींची हत्या करणार्या ४ जणांच्या टोळीला रोह्याच्या पोलिसांनी अटक केली. मे २०२२ मध्ये गोफण गावाच्या डोंगराळ भागात ४ गायी आणि अन्य गोवंशीय यांची हत्या करून काहींनी पळ काढला होता. या घटनेमुळे रोह्यातील नागरिक संतप्त झाले होते. त्यानंतर पोलादपूर, महाड, माणगांव, कर्जत, खालापूर, श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड या तालुक्यातील दुर्गम भागांतील निर्जनस्थळीही गोहत्या करण्यात आल्या होत्या. रोह्यातील घटनेनंतर तक्रारी करूनही आरोपींना अटक झाली नव्हती. शेवटी स्थानिकांनी टेहाळणी करून बेलवाडी परिसरात जनावरे चोरणार्या टोळीला पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. त्यानंतर मे २०२२ मध्ये गोहत्या करणार्या टोळीला पोलिसांनी नुकतीच अटक केली.
संपादकीय भूमिकागोवंश हत्याबंदी कायदा होऊनही गोवंशियांची हत्या चालूच रहाणे, हे कायद्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्याचेच लक्षण ! |