गणेशोत्सवानिमित्त रोहा-चिपळूण १२ डब्यांची ‘मेमू’ !
मुंबई – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या प्रवाशांसाठी मध्य आणि कोकण रेल्वेने रोहा-चिपळूण ‘मेमू’ गाडी चालवण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या गाडीचे रोहा ते चिपळूण केवळ ९० रुपये तिकीट आहे. १९ ऑगस्टपासून १२ डब्यांची ही गाडी प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. माणगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे आणि खेड या स्थानकांत गाडीला थांबा देण्यात आला आहे.