गंगाखेड (जिल्हा परभणी) येथील नागोबाची मूर्ती चोरीला गेल्यापासून गावामध्ये नागाचा वावर !
गंगाखेड (जिल्हा परभणी) – गुरुपौर्णिमेच्या (१३ जुलैच्या) रात्री येथील मंदिरातील पुरातन नागोबाची मूर्ती अज्ञातांनी चोरली. ही मूर्ती चोरीला गेल्यापासून मंदिरामध्ये, तसेच गावामध्ये प्रतिदिन मोठा नाग दिसत आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागोबाची मूर्ती शोधून देण्याची मागणी ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.
गंगाखेड तालुक्यातील माळरानाच्या ठिकाणी वसलेल्या कोद्री गावात ५० ते ६० वर्षांपूर्वीपासूनचे भव्य मंदिर आहे. या ठिकाणी विठ्ठल-रुक्मिणी, हनुमान, महादेव अन् गावातील सोपानकाका महाराज उखळीकर यांच्या जुन्या मूर्ती, तसेच बाहेर एका बाजूला नागोबा आणि दुसर्या बाजूला गणपति अशी मंदिरे आहेत. हे जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.
संपादकीय भूमिकायाविषयी बुद्धीप्रामाण्यवाद्यांना काय म्हणायचे आहे ? |