पुलवामा येथे आतंकवाद्यांच्या गोळीबारात पोलीस अधिकारी वीरगतीला प्राप्त
पुलवामा (जम्मू-काश्मीर) – येथे आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वीरगतीला प्राप्त झाले. विनोदकुमार राय असे त्यांचे नाव आहे. येथील तपासणी नाक्यावर तपासणी करतांना हा गोळीबार करण्यात आला. गेल्या ५ दिवसांत पोलीस अधिकारी वीरगतीला प्राप्त होण्याची ही दुसरी घटना आहे. मुश्ताक अहमद लोन या अधिकार्यांची लाल चौकात आतंकवाद्यांनी हत्या केली होती. इस्लामिक स्टेटने त्यांच्या हत्येची दायित्व स्वीकारले होते.
CRPF officer killed in militant attack in Pulwama district of Jammu and Kashmir: Police
— Press Trust of India (@PTI_News) July 17, 2022
संपादकीय भूमिकाया घटना कायमच्या रोखण्यासाठी त्यांच्या मुळावर म्हणजे पाकवर घाव घाला ! |