पाक सैन्याकडून बलूच मुलींवर अनन्वित अत्याचार !
‘विश्व बलूच महिला संघटने’च्या अध्यक्षा डॉ. नायला कादरी यांची माहिती
पाकचे खरे स्वरूप !
नवी देहली – पाक सैन्य बलूच मुलींना नग्न करून त्यांच्यावर अत्याचार करत आहे. मुलींच्या शरिरात मशीनद्वारे क्षिद्र पाडले जात आहे. ही कृत्ये अमानुष आहेत, अशी माहिती ‘विश्व बलूच महिला संघटने’च्या अध्यक्षा आणि निर्वासित बलूच सरकारच्या पंतप्रधान डॉ. नायला कादरी यांनी ‘दैनिक भास्कर’ला दिली. बलुचांचा पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवण्याचा लढा फार जुना आहे. पाकिस्तानी सैन्याने या भागातील लोकांचे मानवी हक्क दडपले आहेत. पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचारांमुळे बलुचांसाठी जगणे कठीण झाले आहे, तर मृत्यू सोपा वाटू लागला आहे, असेही त्यांनी सांगितले.
वर्ष २०१२ मध्ये सीपार झाल्यानंतर डॉ. कादरी यांनी कॅनडामध्ये आश्रय घेतला आहे. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी पाठिंबा मिळवण्यासाठी त्या सध्या भारताच्या दौर्यावर आहेत. ‘‘मला बलुचिस्तानचे स्वातंत्र्य सर्वाधिक प्रिय आहे. आमचे २ लाखांहून अधिक तरुण आणि महिला स्वातंत्र्यलढ्यात हुतात्मा झाले आहेत. गेल्या १५ वर्षांत पाकिस्तान आणि चीन यांच्या सैन्याने बलुचिस्तानमध्ये ५५ सहस्रांहून अधिक लोकांचे अपहरण केले आहे, असेही डॉ. कादरी यांनी सांगितले.