कामरानने ‘राजू’ बनून केला लव्ह जिहाद, हिंदु युवती गर्भवती राहिल्यावर धर्मांतर करण्यास केले बाध्य !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील घटना
रेखा बनली सना खान !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – कामरान या मुसलमान पुरुषाने स्वत:चे नाव ‘राजू’ सांगून येथील रेखा नावाच्या युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पुढे ती गर्भवती राहिल्यावर कामरानने ‘तुला विवाह करायचा असेल, तर इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल’, अशी धमकी दिली. तिच्या कुटुंबाला सर्व प्रकरण समजल्यावर त्यांनी तिच्याशी सर्व संबंध तोडून टाकले. असाहाय्य झालेल्या रेखाला शेवटी इस्लाम धर्म स्वीकारावा लागला. रेखा सना खान झाली.
पुढे त्यांना मुलगी झाली. विवाहाच्या ११ वर्षांनंतर, म्हणजे दळणवळण बंदीच्या काळात कामरान तिला सोडून गेला आणि त्याने दुसरा विवाह केला. रेखा ‘कामरानला शिक्षा मिळावी’, यासाठी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यासाठी गेली असता पोलिसांनी तिला दाद दिली नाही. (योगी आदित्यनाथ शासनाच्या पोलिसांकडून असे अपेक्षित नाही ! शासनाने संबंधित पोलिस अधिकार्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – संपादक) आता रेखाला न्यायालयात फेर्या माराव्या लागत आहेत. कामरान तिला जिवे मारण्याची धमकी देत आहे. जर अधिक पैशांची मागणी केली, तर ‘तुला आणि तुझ्या मुलीला कापून टाकीन’, असे तो तिला धमकावत आहे. ‘मुलगी मोठी झाल्याने तिच्याकडून वाईट कृत्ये करवून घेऊन पैसे कमाव’, असेही कामरान सांगत आहे.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशातील लव्ह जिहादच्या घटना रोखण्यासाठी सरकारने लव्ह जिहादविरोधी कायद्यात जिहाद्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्याची तरतूद करावी, असेच हिंदूंना वाटते ! |