लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये खाद्य पदार्थांचे पैसे ‘क्यू.आर्. कोड’द्वारे देण्याची व्यवस्था !

(‘क्यू.आर्. कोड’ अर्थात् ‘क्विक रिस्पॉन्स कोड’ म्हणजे बारकोड प्रमाणे असलेली एक प्रकारची सांकेतिक भाषा)

नवी देहली – लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये खाद्य पदार्थांची विक्री करणारे  प्रवाशांकडून मूळ किमतीपेक्षा अधिक पैसे घेत असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने त्यावर उपाययोजना काढली आहे.

‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम्  कॉर्पोरेशन’ने (‘आय.आर्.सी.टी.सी.’ने) ‘मेनू कार्ड’मध्येच ‘क्यू.आर्. कोड’ छापले आहे. विक्री करणारा कर्मचारी हे कार्ड गळ्यात घालून विक्री करील. प्रवासी कोणताही खाद्य पदार्थ विकत घेतल्यावर ‘मेनू कार्ड’वरील मूल्यानुसार ‘क्यू.आर्. कोड’द्वारे पैसे देऊ शकतो. ‘आय.आर्.सी.टी.सी.’च्या सर्व रेल्वे गाड्यांमध्ये ही सुविधा लागू करण्यात येणार आहे.