- हे भगवंता तुझ्यामुळेच आम्ही श्वास घेऊ शकतो !
- श्वास घेण्यासाठी प्राणवायू तूच निर्माण केला आहेस !
- हात आणि त्याची बोटे अशा प्रकारे निर्माण केली आहेस की, आम्ही सर्व प्रकारची कामे करू शकतो !
- पायाची रचना आणि बोटे अशी दिली आहेस की, आम्ही चालू, पळू आणि बसू शकतो !
- पाठीचा मणका दिल्यामुळे ताठ राहू शकतो आणि वाकूही शकतो !
- आम्हाला पंचज्ञानेंद्रिये दिलीस म्हणून आमच्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला आहे !
- जिभेमुळे आम्ही विविध चवींचा आनंद घेऊन तृप्ती अनुभवतो !
- नेत्रांमुळे आम्ही सुंदर सृष्टीचा आनंद अनुभवू शकत आहोत !
- भगवंताने निर्माण केलेले सुमधुर संगीत आणि समोरच्याचे बोलणे कानांनी ऐकू शकतो !
- त्वचेमुळे आमच्या देहाचे रक्षण होते !
- हृदय रक्त शुद्ध निर्माण करण्याचे कार्य अव्याहत करत आहे !
- उदरातील सर्व रचनेमुळे अन्नपचन होते !
- आम्ही खाल्लेल्या अन्नाच्या प्रत्येक कणाचे रक्त बनते, हे किती वैशिष्ट्यपूर्ण आहे !
- फुफ्फुस, मूत्राशय आदी सर्व अंतर्गत अवयव त्यांचे कार्य सुरळीतपणे करत असतात !
- मेंदूतील विविध शाखांमध्ये असलेल्या असंख्य पेशींमुळे सर्व काही नियंत्रणात रहात आहे !