सहसाधकांची ‘समष्टी’ दिल्याविषयी कृतज्ञ आहोत !
हे भगवंता, आमच्या समवेत सेवा करण्यासाठी तू सहसाधकांची ‘समष्टी’ दिलीस. सहप्रवासी साधकांच्या संगतीनेच हा प्रवास आम्ही करू शकत आहोत. त्यांच्या सहकार्यानेच सेवा करणे शक्य होते. सहसाधकच आमचे गुण-दोष पारखू शकतात आणि आम्हाला त्याविषयी सांगू शकतात. त्यांचा सत्संग आमच्यासाठी लाखमोलाचा आहे. त्यांच्या माध्यमातून गुरुतत्त्वच कार्यरत असते आणि ते आम्हाला साहाय्य करते. सहसाधकांनी दोष सांगिल्यामुळे आणि त्यांच्या सत्संगामुळे भगवंता, तुझ्याकडे येण्यासाठी आम्हाला मोलाचे साहाय्य होत आहे. त्यांच्यामुळेच आम्हाला प्रेमभाव वाढवण्याची संधी मिळत आहे. त्यांच्याकडून मिळणारे सर्व प्रकारचे साहाय्य आम्हाला सदैवच त्यांच्या ऋणात ठेवणारे आहे. निर्मळ प्रीतीचे आध्यात्मिक स्तरावरील हे सख्य अनुभवण्यास देणार्या भगवंता, यासाठी मनःपूर्वक कृतज्ञता !