‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेविषयी आश्वस्त करणारे एकमेवाद्वितीय द्रष्टे हिंदूसंघटक !
हे भगवान श्रीकृष्णा, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, धर्मसंस्थापनेचे हे महान कार्य आपण आरंभले आहे. कलियुगातील ही महाभव्य उलथापालथ ‘याची देही याची डोळा’ केवळ पहाण्याचेच नव्हे, तर या कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे आणि त्या माध्यमातून आमचा उद्धार होण्याचे भाग्य तुम्ही आमच्या पदरात टाकले आहे ! आमच्या आध्यात्मिक उन्नतीच्या माध्यमातून राष्ट्राची सर्वांगीण उन्नती होऊन ते धर्मनिष्ठांचे हिंदु राष्ट्र कसे सिद्ध होणार आहे, हे आम्हाला तुम्ही हळूहळू अनुभवण्यास देत आहात !
हे सर्वज्ञानी, सर्वव्यापी भगवंता, तूच कर्ता करविता असलेल्या या हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात आम्हाला सहभागी करून तुझ्या चरणांपर्यंत पोहोचण्याची संधी देत असल्याविषयी आम्ही अनंत कोटी कृतज्ञ आहोत !