सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रमुखांना साधना करण्याचे महत्त्व पटवून देऊन साधना करण्यास प्रवृत्त करणे !
‘प.पू. डॉक्टरांना भेटायला काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख येतात. बहुतेकांत प्रखर राष्ट्रभक्ती आणि राष्ट्राभिमान असतो. त्यांतील काही जण राष्ट्रासाठी प्राण अर्पण करण्यासही सिद्ध असतात; परंतु त्यांच्या कार्याला हवे तसे यश येत नाही. कधी कधी राजकारणी त्यांची टरही उडवतात. काहींना कारावासही सोसावा लागतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर अशा प्रमुखांना आणि कार्यकर्त्यांना ‘साधना चालू करा’, असे आग्रहपूर्वक सांगतात. प.पू. डॉक्टर त्यांना सांगतात, ‘‘साधनेचे बळ आणि समर्थ रामदासस्वामींचे मार्गदर्शन असल्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी राज्य स्थापन करण्यात यशस्वी झाले. बहुतेक क्रांतीविरांना त्यांच्यात प्रखर राष्ट्राभिमान असूनही साधनेचे बळ नसल्यामुळे क्रांती यशस्वी न होता नाहक प्राण गमवावे लागले. समर्थ रामदासस्वामी दासबोधात सांगतात,
सामर्थ्य आहे चळवळीचें । जो जो करील तयाचें ।
परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥
– दासबोध, दशक २०, समास ४, ओवी २६
अर्थ : चळवळ करणे आपल्या हातात आहे; परंतु कार्याचे योग्य नियोजन होण्यासाठी आणि कार्य यशस्वी होण्यासाठी भगवंताचे अधिष्ठान अन् साधनेची आवश्यकता आहे. साधना चालू केल्यावर बर्
याच प्रमुखांना कार्यामध्ये हळूहळू यश मिळू लागले आणि त्यांना कार्य करतांना येणारा मानसिक ताणही नाहीसा झाला आहे. त्यावरून त्यांना साधनेचे महत्त्व पटते.’
– सद्गुरु (कै.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका)