कृतज्ञता म्हणजे काय ?
सृष्टीचा निर्माणकर्ता ईश्वर आहे. आपण त्या सृष्टीचा एक घटक आहोत. त्याच्यामुळे हे जगत आणि आपण अस्तित्वात आलो. त्याला कारण मूळ ईश्वर आहे. माझी सुख-दुःखे, बुद्धी, कर्म, कुटुंब, देश, धर्म, साधना हे सर्व नंतर आहे. त्यामुळे जेथे जेथे ‘मी’चा विचार मनात असेल, तेव्हा ईश्वराविषयी किंवा त्याच्या कोणत्या तरी स्वरूपाविषयी जाणीव असणे आणि त्या जाणिवेचे श्रेयही ईश्वराला अर्पण करणे, याला ‘कृतज्ञता’ म्हणतात. ‘प्रार्थना’ याचा दुसरा अर्थ शरणागती आणि शरणागतीची प्रक्रिया कृतज्ञता व्यक्त केल्याविना पूर्ण होत नाही !
(सनातननिर्मित ग्रंथ -भावजागृतीसाठी साधना)