केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर झालेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ हिंदू संघटनांकडून निषेध !

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे निषेध आंदोलन करतांना विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी

कोल्हापूर, १६ जुलै (वार्ता.) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केरळ येथील कार्यालयावर समाजद्रोह्यांनी ११ जुलै या दिवशी बाँबने आक्रमण केले. हे आक्रमण म्हणजे प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतियावर झालेले आक्रमण होय. यापूर्वीही अनेक स्वयंसेवकांवर जीवघेणे आक्रमण होऊन अनेक स्वयंसेवक आणि हिंदू यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनांना तेथील सरकारचा पाठिंबा असल्यामुळेच अशी कृत्ये करणार्‍यांना कोणती शिक्षा केली जात नाही. तरी याचा केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर झालेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ हिंदू संघटनांकडून निषेध करून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, विश्व हिंदु परिषद यांसह अन्य संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

यानंतर केरळ येथील सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सर्वश्री महेश जाधव, राहुल चिकोडे, अशोक रामचंदानी, अशोक देसाई, हेमंत आराध्ये, सौरभ निकम, अवधूत चौगुले, पराग फडणीस, सचिन तोडकर, संभाजी साळुंखे यांसह अन्य उपस्थित होते.