महापालिकेला वाढीव पाणीपट्टीचा ९४ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार !
पुणे – जलसंपदा विभागाकडून वाढवण्यात आलेल्या जलदरामुळे महापालिकेच्या पाणीपट्टीच्या खर्चात प्रतिसाल ९४ कोटींनी वाढ झाली आहे. महापालिकेला पाणीपट्टी करापोटी १०५.६ कोटी रुपये द्यावे लागत होते; मात्र नव्या जलदरा अन्वये २०० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. जलसंपदा विभागाने राज्यातील घरगुती आणि औद्योगिक पाणीपट्टीत वाढ केली असून नवे दर १ जुलैपासून लागू करण्यात आले आहेत.