पुणे येथे शीतपेयामधून गुंगीचे औषध देऊन अत्याचार करणार्या धर्मांधावर गुन्हा नोंद !
पुणे – तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शीतपेयामधून गुंगीचे औषध देऊन शरीर संबंधाचा ‘व्हिडिओ’ काढून तो प्रसारित करण्याच्या धमकीने तरुणीच्या खोलीच्या विक्रीतून आलेले पैसे, तिच्याकडील बचत आणि वेतन घेऊन ३३ लाख ९३ सहस्र ७२१ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोहेल सय्यद आणि त्याच्या ४ नातेवाइकांवर गुन्हा नोंद केला आहे. पुलगेट परिसरात रहाणार्या एका ३३ वर्षांच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार वर्ष २०१७ ते वर्ष २०१९ या कालावधीत घडला आहे.
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना कठोर शिक्षा केल्यासच असे प्रकार थांबू शकतील ! |