झारखंडमधील मुसलमानबहुल गावातील सरकारी शाळेत हिंदू विद्यार्थ्यांना प्रवेशबंदी !
५ हिंदू विद्यार्थ्यांना शाळेतून काढले !
गढवा (झारखंड) – येथील मानपूर गावात मुसलमानांची लोकसंख्या ९० टक्के आहे. येथील उत्क्रमित मध्य विद्यालय या सरकारी शाळेत हिंदू विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला जात आहे, तसेच शाळेतील हिंदू विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी कामता प्रसाद यांनी ‘या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे’, असे सांगतिले.
गाँव में मुस्लिमों की आबादी 90%, झारखंड के इस सरकारी विद्यालय में हिन्दू बच्चों को नहीं मिलता प्रवेश, 5 छात्रों का नाम काट कर निकाला: रिपोर्ट#Jharkhand https://t.co/3Hhik4u0yc
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 15, 2022
शाळेची व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक महताब अन्सारी यांचे म्हणणे आहे की, या गावातील मुसलमानांची लोकसंख्या ९० टक्के असल्याने येथे केवळ मुसलमान विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिले जात आहे. ज्या विद्यार्थ्यांना शाळेतून काढण्यात आले आहे, त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. हे पैसे शाळेतील बिघडलेला हँडपंप दुरुस्त करण्यासाठी वापरण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे त्यांना शाळेतून काढण्यात आले. (विद्यार्थ्यांचे पैसे अशा प्रकारे वापरणार्या शाळेच्या व्यवस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद करून संबंधितांना कारागृहातच टाकले पाहिजे ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|