‘जय श्रीराम सेने’ संघटनेच्या विरोधानंतर हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी याचा पुण्यातील कार्यक्रम रहित !
पुणे – येथील ‘जवाहरलाल नेहरू मेमोरिअल हॉल’ येथे १५ आणि १६ जुलै या दिवशी होणारा हिंदुद्वेषी मुनव्वर फारूकी याचा कार्यक्रम ‘जय श्रीराम सेना’ या हिंदु संघटनेने दिलेल्या निवेदनानंतर रहित करण्यात आला. फारूकी याने स्वत:च्या ‘इन्स्टाग्राम’ खात्यावर पुण्याचा कार्यक्रम रहित झाल्याची माहिती दिली. ‘जय श्रीराम सेना’ या हिंदु संघटनेने मुनव्वर फारूकी याचा कार्यक्रम रहित करण्याची मागणी करणारे निवेदन पुण्याच्या पोलीस आयुक्तांना दिले होते. कार्यक्रम रहित न केल्यास आंदोलन करण्याची चेतावणीही संघटनेने दिली होती.
Pune show of Munawwar Faruqui cancelled after Jai Shri Ram Sena submits objection letter to Commissioner of Police: Detailshttps://t.co/iEvMB9HzOh
— OpIndia.com (@OpIndia_com) July 16, 2022
‘जय श्रीराम सेने’ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारा गुजरात येथील स्वयंघोषित विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी १५ जुलै या दिवशी ‘डोंगरी टू नोव् हेअर’ (कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिमच्या ‘डोंगरी टू दुबई’ या चरित्रावरून प्रेरित नाव) नावाच्या ‘टॉक शो’साठी (संवादात्मक कार्यक्रमासाठी) पुण्यात येत आहे.
२. मुनव्वर फारूकी याची पार्श्वभूमी हिंदुद्वेषी आणि आक्षेपार्ह वक्तव्ये करण्याची आहे. त्याने यापूर्वीही राष्ट्रीय नागरिकता नोंदणी अर्थात् ‘एन्.आर्.सी.’ कायदा, ‘ग्रोधा हत्याकांडातील कारसेवकांचा मृत्यू’ आदींविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. एका गाण्याद्वारे त्याने ‘एन्.आर्.सी.’ कायद्याची खिल्ली उडवली असून या कायद्याची तुलना देहली दंगलीशी केली आहे.
३. सातत्याने हिंदूंंच्या देवतांचा अवमान करण्यात तो पटाईत आहे. १ जानेवारी या दिवशी मुनव्वर फारूकी याने त्याच्या कार्यक्रमामध्ये प्रभु श्रीराम आणि सीतामा यांचा अपमान केला होता. या प्रकरणी मध्यप्रदेश पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्याला अटकही झाली होती. नंतर तो जामिनावर सुटला. हे सर्व लक्षात घेता हिंदुद्वेषी मुनव्वर फारूकी याचा कार्यक्रम रहित करावा.
संपादकीय भूमिका‘हिंदू संघटित झाल्यावर हिंदुद्वेष्ट्यांना माघार घ्यावी लागते’, हेच यावरून लक्षात येते ! सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्या हिंदुद्वेषी मुनव्वर फारूकी याच्या कार्यक्रमांवर सरकारने सर्वत्र बंदी आणून त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे ! |