‘मंदिर-मशीद दर्शन’ उपक्रमाच्या नावाखाली हिंदु विद्यार्थ्यांना मशिदीमध्ये नेणार्या पोद्दार शाळेतील संबंधितांवर कठोर कारवाई करा !
चोपडा (जिल्हा जळगाव) येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची गटशिक्षण अधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
चोपडा (जिल्हा जळगाव) – आषाढी एकादशीच्या दिवशी ‘बकरी ईद’ असल्याने येथील प्राथमिक पोद्दार शाळेत बहुसंख्य हिंदु विद्यार्थी असूनही त्यांना ‘मंदिर-मशीद दर्शन’ या उपक्रमाच्या नावाखाली मंदिर आणि मशीद येथे नेण्यात आले. ‘देशात उदयपूर आणि अमरावती येथे हिंदूंची हत्या केल्याच्या घटना नुकत्याच घडलेल्या असतांना शाळेने केलेला हा उपक्रम अयोग्य असून मनमानीपणे असे उपक्रम राबवणारी पोद्दार शाळा, तिचे विश्वस्त आणि संबंधित शिक्षक यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. यासह तालुक्यातील शाळांना कोणतेही उपक्रम राबवण्यापूर्वी शिक्षण विभागाची अनुमती घेणे बंधनकारक करण्यात यावे’, अशी मागणी येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि पक्ष यांनी गटशिक्षणाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, चोपडासारख्या संवेदनशील शहरातील शाळेमध्ये हा उपक्रम राबवण्यापूर्वी पोद्दार शाळेने शिक्षण विभागाला विचारले होते का ? पारंपरिक वेशभूषेत भगवा ध्वज हातात घेऊन जाणार्या हिंदु विद्यार्थ्यांना पाहून कुणा माथेफिरूने काही केले असते, तर त्याला उत्तरदायी कोण असते ? अशा विचित्र उपक्रमातून शहराचे वातावरण बिघडू शकते.