कर्नाटकमधील दंगलीत घायाळ झालेल्या मुसलमान महिलेने हानीभरपाईचे पैसे काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांच्या वाहनावर फेकले !
सिद्धरामय्या यांनी देऊ केली होती हानीभरपाई !
बागलकोट (कर्नाटक) – येथे काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी दंगलीच्या प्रकरणी घायाळ झालेल्या मुसलमान महिलेला २ लाख रुपये हानीभरपाई देऊ केल्यावर तिने ते पैसे सिद्धरामय्या यांच्या वाहनावर फेकून दिले. या महिलेने ‘शहरातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली करा’, असे त्यांना सुनावले. या दंगलीत ४ मुसलमान घायाळ झाले होते. त्यांना प्रत्येकी २ लाख रुपये देण्याची घोषणा सिद्धरामय्या यांनी केली होती.
#WATCH | Karnataka: A woman, whose husband was injured in recent Kerur violence, threw the money that was given to her as a relief amount by Congress leader Siddaramaiah, at his vehicle today in Bagalkote. He was visiting a hospital to meet the people who were injured in violence pic.twitter.com/if8YqScyBT
— ANI (@ANI) July 15, 2022
संपादकीय भूमिकादंगलीत हिंदू घायाळ झाले असते, तर सिद्धरामय्या किंवा काँग्रेसचे अन्य नेते कधी त्यांना हानीभरपाई देण्यास गेले असते का ? आतापर्यंत काँग्रेसने कधी असे केले आहे का ? |