सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी त्वचेची ठेवण श्रीविष्णूच्या कपाळावरील टिळ्याप्रमाणे, म्हणजेच इंग्रजी भाषेतील ‘U’ या अक्षराप्रमाणे दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘श्रीविष्णूच्या अवतारांच्या दैवी देहांवर विविध प्रकारची शुभचिन्हे उमटतात. उदा. धर्मध्वज, सुदर्शनचक्र, शंख, धनुष्य, कमळ, गदा, इत्यादी. श्रीविष्णूच्या कपाळावरील इंग्रजी भाषेतील ‘U’ या अक्षराप्रमाणे दिसणारा चंदनाच्या टिळ्याचा आकार हेसुद्धा श्रीविष्णूचेच एक ‘शुभचिन्ह’ आहे.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कपाळावरील त्वचेची ठेवण श्रीविष्णूच्या कपाळावरील टिळ्याप्रमाणे होण्यामागील अध्यात्मशास्त्र
परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये ५ टक्के विष्णुतत्त्व कार्यरत झाले आहे. त्यामुळे त्यांच्या कपाळाच्या त्वचेवर श्रीविष्णूच्या कपाळावरील टिळ्याप्रमाणे, म्हणजे इंग्रजी भाषेतील ‘U’ या अक्षराप्रमाणे चिन्ह उमटले आहे.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कपाळावरील ‘U’ या आकाराच्या टिळ्याची आध्यात्मिक वैशिष्ट्ये
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कपाळावरील ‘U’ या आकाराच्या टिळ्याच्या आतील पोकळीमध्ये श्रीविष्णूचे निर्गुण स्तरावरील चैतन्य आकाशतत्त्वाच्या स्तरावर कार्यरत झाले आहे. ‘U’ या आकाराच्या टिळ्याच्या कडेतून श्रीविष्णूचे निर्गुण-सगुण स्तरावरील चैतन्य तेज तत्त्वाच्या स्तरावर कार्यरत झाले.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कपाळावरील त्वचेवर श्रीविष्णूच्या कपाळावरील इंग्रजीतील ‘U’ या आकाराच्या चंदनाच्या टिळ्याप्रमाणे असलेल्या चिन्हामध्ये श्रीविष्णूचे निर्गुण स्तरावरील चैतन्य कार्यरत होऊन त्यातून आवश्यकतेनुसार तारक, तारक-मारक आणि मारक-तारक या शक्तींचे प्रक्षेपण होणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कपाळावरील त्वचेवर श्रीविष्णूच्या कपाळावरील इंग्रजीतील ‘U’ या आकाराच्या चंदनाच्या टिळ्याप्रमाणे चिन्ह आले आहे. या टिळ्यामध्ये श्रीविष्णूचे निर्गुण स्तरावरील चैतन्य आकृष्ट होते. जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सुषुम्नानाडी चालू असते, तेव्हा त्यांच्या टिळ्यातील श्रीविष्णूचे निर्गुण स्तरावरील चैतन्य मध्यभागी कार्यरत असते. जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील श्रीविष्णूचे निर्गुण तत्त्व अप्रकट अवस्थेत असते, तेव्हा त्यांच्या कपाळाच्या टिळ्याच्या मध्यभागी श्रीविष्णूचे निर्गुण स्तरावरील चैतन्य साठते. जेव्हा परात्पर गुरुदेवांची चंद्रनाडी चालू होते, तेव्हा या टिळ्याच्या डाव्या भागातील टोकातून श्रीविष्णूची तारक शक्ती आणि निर्गुण-सगुण स्तरावरील चैतन्य यांचे प्रक्षेपण होते. त्याचप्रमाणे जेव्हा परात्पर गुरुदेवांची सूर्यनाडी चालू होते, तेव्हा या टिळ्याच्या उजव्या भागातील टोकातून श्रीविष्णूची मारक शक्ती आणि सगुण-निर्गुण स्तरावरील चैतन्य यांचे प्रक्षेपण होते.
४. श्रीविष्णूचे अंशावतार असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून आवश्यकतेनुसार उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्याशी संबंधित कार्य चालू असणे
अशा प्रकारे जेव्हा श्रीविष्णूचे अंशावतार असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्य टिळ्याच्या डाव्या बाजूला कार्यरत असते, तेव्हा त्यांचे उत्पत्तीशी संबंधित दैवी कार्य चालू असते. जेव्हा हे चैतन्य टिळ्याच्या मध्यभागी असते, तेव्हा त्याचे स्थितीशी संबंधित कार्य चालू असते. जेव्हा हे चैतन्य टिळ्याच्या उजव्या बाजूला असते, तेव्हा त्याचे लयाशी संबंधित दैवी कार्य चालू असते.
५. श्रीविष्णूचे अंशावतार असणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कपाळावरील त्वचेवर श्रीविष्णूच्या कपाळावरील ‘U’ आकाराच्या टिळ्याप्रमाणे चिन्ह आल्यामुळे सूक्ष्म स्तरावर जाणवलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कपाळावरील त्वचेवर श्रीविष्णूच्या कपाळावरील टिळ्याप्रमाणे चिन्ह आल्यामुळे सूक्ष्म स्तरावर होणारे अवतारी कार्य
६ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून प्रक्षेपित झालेल्या श्रीविष्णूच्या इच्छाशक्तीमुळे जिज्ञासू, मुमुक्षु, हिंदुत्वनिष्ठ आणि साधक यांच्यातील क्षात्रतेज अन् क्षात्रभाव जागृत होणे : परात्पर गुरुदेवांकडून प्रक्षेपित झालेल्या इच्छाशक्तीमुळे पृथ्वीवरील जिज्ञासू, मुमुक्षु, हिंदुत्वनिष्ठ आणि साधक यांच्यामध्ये क्षात्रतेज जागृत होत आहे. त्यामुळे ते स्वत:तील स्वभावदोष आणि अहं दूर करण्यासाठी त्यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया मनापासून आणि क्षात्रभावाने राबवून त्यांच्याशी सूक्ष्मातून लढत आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा त्यांना सूक्ष्मातून वाईट शक्तींचा त्रास होतो, तेव्हा ते विविध प्रकारचे आध्यात्मिक उपाय करून क्षात्रभावाने लढून या त्रासांवर मात करून धर्माचरण आणि साधना करण्यासाठी प्रयत्नरत झाले आहेत. त्याचप्रमाणे पृथ्वीवर विविध देशांमध्ये रहाणारे जिज्ञासू, मुमुक्षु, हिंदुत्वनिष्ठ आणि साधक यांना त्यांचे कुटुंबीय किंवा नातेवाईक किंवा समाजातील दुष्ट प्रवृत्तीचे लोक यांच्याकडून धर्माचरण अन् समष्टी साधना करण्यासाठी स्थुलातून तीव्र स्वरूपाचा विरोध होत आहे.
त्यांच्यावरील श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे ते धर्माचरण आणि व्यष्टी अन् समष्टी स्तरांवरील साधनेचे प्रयत्न मनापासून, चिकाटीने आणि तळमळीने करत आहेत.
६ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून प्रक्षेपित झालेल्या श्रीविष्णूच्या क्रियाशक्तीमुळे पृथ्वीवर सूक्ष्म आणि स्थूल अशा दोन्ही स्तरांवर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी आवश्यक असणारे दैवीबळ, योगबळ, तपोबळ आणि ज्ञानबळ रूपी आध्यात्मिक बळ मिळणे : परात्पर गुरुदेवांकडून क्रियाशक्तीचे प्रक्षेपण झाल्यामुळे विविध विषयांमध्ये पारंगत किंवा तज्ञ असणार्या व्यक्ती अन् कलाकार सनातन संस्थेच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे हिंदु राष्ट्रासाठी उपयुक्त असणारे विविध विषय, कला, विद्या इत्यादींचे ज्ञान मिळत आहे. तसेच विविध योगमार्गांनी साधना केलेले आणि आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असणारे विविध संत अन् सिद्धपुरुष हे देखील सनातन संस्था आणि तिच्याशी संलग्न असणार्या संस्था यांच्या संपर्कात येत आहेत. त्यांच्यामुळे पृथ्वीवर सूक्ष्म आणि स्थूल अशा दोन्ही स्तरांवर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी आवश्यक असणारे दैवीबळ, योगबळ, तपोबळ आणि ज्ञानबळ रूपी आध्यात्मिक बळ मिळत आहे.
६ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून प्रक्षेपित झालेल्या श्रीविष्णूच्या ज्ञानशक्तीमुळे पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना ज्ञानशक्तीच्या बळावर होणार असणे : परात्पर गुरुदेवांच्या आज्ञाचक्रातून श्रीविष्णूची ज्ञानशक्ती पुष्कळ प्रमाणात पृथ्वीच्या वायूमंडलात प्रक्षेपित होते. पृथ्वीवरील ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ ही ज्ञानशक्तीच्या बळावर होणार असल्यामुळे काळानुसार परात्पर गुरुदेवांकडून पुष्कळ प्रमाणात ज्ञानशक्तीयुक्त धर्मशक्तीचे प्रक्षेपण होत आहे. त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर काळानुसार हिंदु धर्म आणि अध्यात्म यांचा प्रसार विहंगम गतीने चालू आहे. विष्णुस्वरूप परात्पर गुरुदेवांकडून प्रक्षेपित झालेल्या ज्ञानशक्तीमुळे सध्या चालू असणार्या त्रासदायक काळचक्राचा अंत होऊन हिंदु राष्ट्रासाठी पूरक असणारे कालचक्र चालू होणार आहे. अशा प्रकारे हिंदु राष्ट्रासाठी जेव्हा काळाची सूक्ष्म स्तरावरील अनुकूलता प्राप्त होईल, तेव्हा स्थळाच्या स्तरावर म्हणजे स्थुलातून संपूर्ण पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे.
कृतज्ञता
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कपाळावर आज्ञाचक्राच्या ठिकाणी असणार्या त्वचेवर श्रीविष्णूच्या ‘U’ या टिळ्याप्रमाणे चिन्ह उमटल्यामुळे त्याचा समष्टीला आध्यात्मिक स्तरावर कशा प्रकारे लाभ होतो’, ही सूत्रे शिकायला मिळाली’, यासाठी मी श्रीगुरुचरणी मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त आहे.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(१५.२.२०२२)
|