गुजरात दंगलीनंतर भाजपचे सरकार पाडण्यासाठी काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांनी कट रचला होता !
|
कर्णावती (गुजरात) – वर्ष २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीनंतर राज्यातील भाजपचे सरकार पाडण्यासाठी काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या सांगण्यावरून एक मोठा कट रचण्यात आला होता. तिस्ता सेटलवाड यादेखील या कटात सहभागी होत्या, असे प्रतिज्ञापत्र गुजरात पोलिसांच्या विशेष अन्वेषण पथकाने येथे सत्र न्यायालयात प्रविष्ट केले.
The Gujarat Police claimed that Teesta Setalvad was part of a “larger conspiracy” carried out at the behest of late Congress leader Ahmed Patel to dismiss the BJP government in the state after the 2002 riots.
(@gopimaniar ) https://t.co/tk2hG02B2H— IndiaToday (@IndiaToday) July 16, 2022
या प्रतिज्ञापत्रात पुढे म्हटले आहे की, हा कट रचतांना सेटलवाड यांचा उद्देश निवडून आलेले सरकार विसर्जित करणे किंवा अस्थिर करणे, हा होता. त्यासाठी त्यांनी अनेकांना चुकीच्या पद्धतीने अडकवण्याच्या प्रयत्न केला. अहमद पटेल यांच्या सांगण्यावरून सेटलवाड यांना या दंगलीनंतर ३० लाख रुपये मिळाले होते, तसेच या दंगलीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची नावे गोवण्यासाठी देहलीमध्ये दोघांच्या बैठकीदेखील होत होत्या.
गुजरात दंगलीच्या प्रकरणी अनेकांना चुकीच्या पद्धतीने अडकवण्याच्या आरोपाखाली कर्णावती पोलिसांच्या गुन्हे शाखेने २ व्यक्तींना नुकतीच अटक केली. यामध्ये सेटलवाड यांचाही समावेश आहे.