(म्हणे) ‘भगतसिंह आतंकवादी होता !’
शिरोमणी अकाली दल (अमृतसर)चे खासदार सिमरनजीत सिंंह मान यांचे विधान
खलिस्तानविषयी बोलायला अडचण नसल्याचाही दावा !
चंडीगड – ‘भगतसिंह याने एका तरुण ब्रिटिश अधिकार्याची, अमृतधारी शीख हवालदार चन्नन सिंह याची हत्या केली होती. ‘नॅशनल असेंब्ली’त बाँबही फेकला होता. आता तुम्ही मला सांगा की, भगतसिंह आतंकवादी होते कि भगत होते ? लोकांची हत्या करून संसदेत बाँब फेकणे, ही लाजिरवाणी गोष्ट नाही का ?’, असे विधान पंजाबमधील संगरुर येथील नवनिर्वाचित खासदार आणि शिरोमणी अकाली दल (अमृतसर)चे नेते सिमरनजीत सिंंह मान यांनी केले. या वेळी पत्रकारांनी त्यांना ‘भगतसिंह इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढले’, असे सांगितले असता ते म्हणाले, ‘‘ही तुमची विचारसरणी आहे; पण काहीही असले, तरी भगतसिंह आतंकवादी आहे.’’
Newly elected pro-Khalistan Sangrur MP Simranjit Singh Mann calls Bhagat Singh ‘terrorist,’ Punjab minister slams remarks, urges to apologisehttps://t.co/Qu5UVsM7C9
— OpIndia.com (@OpIndia_com) July 16, 2022
१. सिमरनजीत सिंह मान पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, तुम्ही खलिस्तानवर बोलू शकता, तसेच सभा घेऊ शकता. खलिस्तानविषयी बोलायला अडचण नाही.
२. मान यांच्या विधानावर आम आदमी पक्षाने आक्षेप घेतला आहे. त्यांचे हे विधान अपमानास्पद आणि लज्जास्पद असल्याचे पक्षाने म्हटले आहे, तसेच कॅबिनेट मंत्री गुरमीत सिंह यांनी ‘मान यांनी क्षमा मागावी’, अशी मागणी केली आहे.
संपादकीय भूमिका
|