सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुरुपौर्णिमा महोत्सवांतील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !
गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी सहकार्य करणार्यांचे आभार !
वेंगुर्ला
१. श्री. अंबरीश मांजरेकर यांनी त्यांचे ‘साई दरबार हॉल’ सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले, तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी ७० जणांसाठी दुपारचा महाप्रसाद आणि सायंकाळी चहा यांची व्यवस्था विनामूल्य केली.
२. श्री. विजय रेडकर यांनी ‘प्रोजेक्टर’ (कार्यक्रमाचे चित्रीकरण पडद्यावर दाखवणारी यंत्रणा) विनामूल्य उपलब्ध करून दिला.
मालवण
१. मालवण नगरपरिषद प्रशासनाने अल्प मोबदल्यात सभागृह उपलब्ध करून दिले.
२. ‘बांबू हॉटेल’चे मालक संजय गावडे, ‘जानकी हॉटेल’चे मालक विनय चव्हाण, ‘स्वामी हॉटेल’चे मालक ऋषिकेश पेनकर यांनी साधकांसाठी विनामूल्य भोजनव्यवस्था केली.
३. मधुकर चव्हाण आणि ‘जयअंबे बेकरी’ यांनी अल्पोपहार उपलब्ध करून दिला.
४. मिलिंद(बाबू) धुरी यांनी विद्युत् आणि ध्वनी यंत्रणा, तसेच ग्रंथ, साहित्य यांच्या प्रदर्शनासाठी टेबल आणि व्यासपिठावर घालण्यासाठी गालिचा विनामूल्य उपलब्ध करून दिले.
५. मालवण नगरपरिषदेचे कर्मचारी सुभाष कुमठेकर यांनी सभागृहातील सर्व व्यवस्थेसाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले.
६. माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगरसेवक मंदार केणी यांनी ‘प्रोजेक्टर’ विनामूल्य उपलब्ध करून दिले.
७. ‘रामेश्वर प्रिंटींग प्रेस’ने कापडी फलक आणि फ्लेक्स पट्ट्या बनवून दिल्या.
देवगड
१. श्री. सुधीर घाडी यांनी ध्वनीवर्धक यंत्रणा अल्पदरात दिली.
२. श्री. सुभाष भुजबळ यांनी उद्घोषणा करण्यासाठी ध्वनीवर्धक (स्पीकर) आणि रिक्शा अल्पदरात दिली.
३. श्री. श्रीरंग पाटणकर यांनी ३ दिवस कार्यस्थळ, वीज, पाणी आणि अन्य सुविधा विनामूल्य दिल्या.
४. श्री. प्रसाद धुपकर यांनी अल्पदरात चहापान व्यवस्था केली. श्री. मोहन पाटील चहा विनामूल्य दिला.
५. श्री. महेश खोत यांनी ‘प्रोजेक्टर’ विनामूल्य दिला.
कणकवली
१. श्री. दत्ताराम कराळे यांनी ‘मातोश्री मंगल कार्यालय सभागृह’ विनामूल्य उपलब्ध करून दिले.
२. श्री. संतोष काकडे यांनी ‘प्रोजेक्टर स्क्रीन’ विनामूल्य उपलब्ध करून दिले.
३. तरंदळे येथील श्री. नरेश घाडीगावकर आणि कणकवली येथील श्री. विश्वनाथ चव्हाण यांनी ध्वनीवर्धक यंत्रणा विनामूल्य उपलब्ध करून दिली.
४. गुरुपौर्णिमा कार्यक्रमाच्या उद्घोषणेसाठी सातरल येथील श्री. सुहास बागवे यांनी त्यांची रिक्शा २ दिवस विनामूल्य उपलब्ध करून दिली
सर्व ठिकाणी स्थानिक पोलिसांनी गुरुपौर्णिमा कार्यक्रमाच्या उद्घोषणेसाठी अनुमती दिली.
क्षणचित्रे
देवगड – कार्यक्रमात महिलांची उपस्थिती अधिक होती. नगरसेवक श्री. विशाल मांजरेकर आणि येथील प्रतिष्ठित नागरिक श्री. दत्तात्रेय जोशी यांची उपस्थिती लाभली.
कुडाळ – कार्यक्रम संपल्यावर काही जिज्ञासूंनी स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग आणि बालसंस्कार वर्ग यांविषयी अधिक माहिती जाणून घेतली अन् त्यांच्या परिसरात वर्ग चालू करण्याची मागणी केली.
कार्यक्रमस्थळी सर्वांत अधिक देवगड येथे ५००, तर त्याखालोखाल कुडाळ येथे ४५० उपस्थिती होती.
कणकवली – एस्.टी.चे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक श्री. प्रकाश रसाळ सपत्नीक उपस्थित होते. तरंदळेचे सरपंच सौ. नम्रता देऊलकर, प्रतिष्ठित व्यापारी नंदकुमार आरोलकर आणि ‘दैनिक पुढारी’चे प्रतिनिधी श्री. अजित सावंत उपस्थित होते.
वेंगुर्ला – तहसीलदार कार्यालयातील ‘रजिस्ट्रार’ पदावर कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या प्रसारासाठी केली जाणारी उद्घोषणा ऐकून कार्यक्रमाला आल्या होत्या. कार्यालयीन कामकाज आटोपून कार्यक्रमाला यायला त्यांना विलंब झाला होता. त्याविषयी ‘थोडा वेळ तरी कार्यक्रमाला उपस्थित रहाता आले’, असे त्यांनी कृतज्ञापूर्वक सांगितले.