लागला जिवाला आनंदाचा छंद ।
आनंद इथे आनंद ।
आनंद असा आनंद ।
आनंद अनंत अनंत ।
करी सुख-दुःखाचा अंत ।। १ ।।
हा जीव असे गं शिव ।
हा शिव असे गं नाद ।
हा सत्शक्तीचा साद ।
या हृदयात अनाहत नाद ।। २ ।।
पर्जन्याच्या पडती धारा ।
गार गार हा पहाट वारा । मातीला सुटला गंध ।
लागला जिवाला आनंदाचा छंद ।। ३ ।।
आनंद इथे, आनंद तिथे । आनंद भेटतो जिथे-तिथे ।।
घट भरला गं आनंदाने । एकही स्थान न दिसे रिते ।। ४ ।।
सगुणाची गं रूपे अनेक । सर्वांमध्ये निर्गुण एक ।
निर्गुण दिसतो ठायी ठायी । आनंदाला उधाण येई ।। ५ ।।
– सौ. शालिनी प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(२२.५.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |