ऐसे माझे गुरु, जे आहेत साक्षात् महाविष्णु ।
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘२२.९.२०२० या दिवशी सकाळी मी नामजपाला बसलेले असतांना देवाच्या कृपेने मला पुढील कविता सुचली.
गुरु म्हणजे आनंद ।
दुःखाचा डोंगर कोसळला, तरी त्यातून तारून नेणारी नाव ।। १ ।।
गुरु म्हणजे परमानंद ।
सर्व दरवाजे बंद झाल्यानंतर
आशेच्या किरणाने उघडते ते दार ।। २ ।।
गुरु म्हणजे चैतन्याचा वहाणारा प्रचंड आणि अखंड झरा ।
जेव्हा सर्वत्र अंधकार होतो,
तेव्हा अंधुक प्रकाशात तेवणारा दिवा ।। ३ ।।
कसे वर्णावे गुरूंचे माहात्म्य ….
जे आंधळ्या जिवाचे (टीप १) दृष्टी बनून येतात ।
मुक्या जिवाची (टीप २) वाणी बनून येतात ।। ४ ।।
बहिऱ्या या जिवाची (टीप ३) श्रवणशक्ती बनून येतात ।
तर बुद्धीहीन जिवाची (टीप ४) प्रज्ञा बनून येतात ।। ५ ।।
गुरु म्हणजे उष्ण झालेल्या वातावरणात
येणारी थंड वाऱ्याची झुळूक ।
गुरु म्हणजे आयुष्यात भटकणाऱ्या जिवाला
मिळणारा पूर्णविराम (टीप ५) ।। ६ ।।
गुरु म्हणजेच ईश्वर । गुरुच आहे परमेश्वर ।। ७ ।।
गुरूंना (टीप ६) परमेश्वर म्हणू कि परमेश्वराला गुरु ।
लाभले आम्हांसी ऐसे गुरु, जे आहेत साक्षात् महाविष्णु ।। ८ ।।
कृतज्ञ आम्ही सर्व साधक, कृतज्ञ आम्ही सर्व जीव ।
तव चरणी येण्याची राहो, आम्हाला सदैव जाणीव ।। ९ ।।
टीप १ – मायेत गुंतलेला जीव
टीप २ – जो साधनेविषयी बोलू इच्छित नाही.
टीप ३ – ज्याला साधनेबद्दल काही ऐकायचे नाही.
टीप ४ – ज्याला साधना समजून घायची नाही.
टीप ५ – साधनामार्गाला लागणे
टीप ६ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले’
– सौ. राजलक्ष्मी जेरे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सॅन डिएगो, अमेरिका. (२२.९.२०२०)