इराण आणि तैवान या देशांनी भारताचा ४० सहस्र किलो चहा परत पाठवला !
आसाम – येथून निर्यात केलेल्या चहातील ४० सहस्र किलो चहा इराण आणि तैवान या देशांनी भारताला परत पाठवला. यासाठी त्यांनी चहामध्ये निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक कीटकनाशके असल्याचे कारण दिले आहे. त्यामुळे ५३ टक्के चहाचे उत्पादन करणार्या आसामच्या उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. तज्ञांच्या मते, चहामध्ये मर्यादित प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करावा लागतो. त्यामुळे चहा परत करण्याचा निर्णय योग्य नाही. संकटग्रस्त श्रीलंकेत चहाचे उत्पादन घटत आहे आणि भारतीय उत्पादक निर्यात वाढवत आहेत; मात्र काही देश कीटकनाशके प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे सांगत भारतीय चहाची अपकीर्ती करत आहेत.
संपादकीय भूमिकायापूर्वी इजिप्त आणि तुर्की यांनी भारताचा गहू परत पाठवला होता, तर आता इराण अन् तैवान यांनी भारतीय चहा परत पाठवला आहे. यावरून इस्लामी देश आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची जाणूनबुजून अपकीर्ती करत असल्याचे उघड होते ! भारताने अशा उन्मत्त आणि खोटारड्या देशांना निर्यात करू नये ! |