भरतपूर (राजस्थान) येथील पुजार्याला मंदिर सोडून न गेल्यास शिरच्छेद करण्याची धमकी
भरतपूर (राजस्थान) – येथील एम्.एस्.जे. महाविद्यालयाच्या परिसरात असणार्या मंदिरातील पुजार्याला १० दिवसांत मंदिर सोडून न गेल्यास त्यांचा कन्हैयालाल यांच्याप्रमाणे शिरच्छेद करण्यात येईल, अशी धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे. हे पत्र महाविद्यालयाच्या भिंतीवर चिकटवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी अ.भा.वि.प. ने महाविद्यालयाच्या बाहेर निदर्शने केली.
संपादकीय भूमिकाराजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यापासून तेथील हिंदू असुरक्षित झाले आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी राज्यातील हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक ! |