मारहाण करणार्या २ धर्मांधांना न्यायालय उठेपर्यंत उभे रहाण्याची शिक्षा !
संभाजीनगर – रस्त्यात उभी केलेली रिक्शा बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून २ धर्मांध रिक्शाचालकांनी शहर बसचालक रामेश्वर काळे यांना शिवीगाळ करत बसमध्ये घुसून मारहाण केली, तसेच बसच्या काचेवर लाथ मारून बसची हानी केली. शेख अन्वर शेख अफसर आणि शेख इरफान शेख शहाबाज अशी आरोपींची नावे आहेत. (लोकसंख्येत अल्पसंख्य असलेले धर्मांध गुन्हेगारीत बहुसंख्य आणि पुढे ! – संपादक) ही घटना १५ सप्टेंबर २०१६ या दिवशी घडली होती. या प्रकरणी न्यायाधिशांनी ठोठावलेल्या शिक्षेच्या विरोधात प्रविष्ट केलेल्या अपिलात आरोपींना न्यायालय उठेपर्यंत उभे रहाण्याची आणि प्रत्येकी ७ सहस्र ५०० रुपये दंडाची शिक्षा १३ जुलै या दिवशी न्यायाधिशांनी केली.