राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी साधला युतीच्या खासदार आणि आमदार यांच्याशी संवाद !
मुंबई – राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी १४ जुलै या दिवशी मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना यांचे खासदार अन् आमदार यांच्याशी संवाद साधला. १८ जुलै या दिवशी होणार्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुर्मू मुंबई येथे आल्या होत्या.
शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा घोषित केला आहे. शिवसेना महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये असूनही शिवसेनेचे आमदार आणि खासदार या बैठकाला उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही या वेळी उपस्थित होते. या ठिकाणी आदिवासी समाजाच्या वतीने विविध नृत्ये सादर करून मुर्मू यांचे स्वागत करण्यात आले. मुर्मू यांचे स्वागत करतांना त्यांना आदिवासी समाजातील प्रथेप्रमाणे मोरपिस असलेले मुकूट घालण्यात आले.