मदुराई (तमिळनाडू) येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गुरुपौर्णिमेच्या संदेशाचे वाचन करतांना सौ. लक्ष्मी नायक
गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना श्री. पाला संतोष

मदुराई – १० जुलै २०२२ या दिवशी मदुराई (तमिळनाडू) येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. या कार्यक्रमाचा प्रारंभ प्रार्थनेने झाला. यानंतर सौ. लक्ष्मी नायक यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गुरुपौर्णिमेच्या संदेशाचे वाचन केले. सनातन संस्थेच्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. सुगंधी जयकुमार यांनी ‘धर्माचरण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना’, यांविषयीचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कलेवणी बल्लीनायगम यांनी केले. या कार्यक्रमाला अनेक जण उपस्थित होते.

गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना सौ. सुगंधी जयकुमार
‘हिंदु इळैंगर येळूच्ची पेरवई’ (हिंदु युवा जागरूकता महासंघ)चे तंजावूर येथील नेते श्री. पाला संतोष यांनी मुख्य अतिथी म्हणून भाषण केले. ते म्हणाले, ‘‘मदुराई ही पुण्यभूमी आहे. मदुराई मीनाक्षी अम्मादेवीमुळे पावन झालेली ही भूमी हिंदु संस्कृतीचे केंद्र आहे. गावागावांमधून हिंदु संस्कृतीविषयी जागृती होणे आवश्यक आहे.’’

क्षणचित्रे

१. सभागृहाचे मालक श्री. सुब्बुराम यांनी कार्यक्रमासाठी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले. तसेच त्यांनी भोजनही अर्पण केले.

२. सभागृहाचे व्यवस्थापक राजशेखर यांनी सनातनचे सत्संग तरुणांपर्यंत पोचवण्याची तीव्र इच्छा असल्याचे सांगितले.