क्षात्रतेजापेक्षा ब्राह्मतेज श्रेष्ठ !
१. ‘क्षत्रियांचे बळ म्हणजे त्यांचे तेज आहे आणि ब्राह्मणांचे बळ म्हणजे क्षमा आहे.
२. महर्षि वसिष्ठांनी नंदिनी गायीला (कामधेनूला) पळवणार्या विश्वामित्र राजाला युद्धात हरवल्यावर राजा साधनेला लागणे : महर्षि वसिष्ठांचे युद्धकौशल्य पाहून राजा विश्वामित्र आग्नेयास्त्र आणि अन्य दिव्यास्त्रांचा वापर करू लागला. ते सर्व अग्नीच्या ज्वाळा सोडत महर्षि वसिष्ठांवर तुटून पडले; परंतु महर्षि वसिष्ठांनी ब्रह्मबळाने प्रेरित छडीने सर्व दिव्यास्त्रांना परतवून लावले.
त्या वेळी महर्षि वसिष्ठ म्हणाले, ‘‘दुरात्मा गाधिनंदन, आता तू परास्त झाला आहेस. तुझ्यात आणखी उत्तम पराक्रम असेल, तर मला दाखव.’’ आव्हान दिल्यावर राजा विश्वामित्र लज्जित होऊन उत्तर देऊ शकला नाही. ब्राह्मतेजाचा हा आश्चर्यकारक चमत्कार पाहून तो क्षत्रियत्वाने खिन्न आणि उदासीन होऊन म्हणाला, ‘‘धिग्बलं क्षत्रियबलं ब्रह्मतेजो बलं बलम् ।’ (वाल्मीकिरामायण, बालकाण्ड, सर्ग ५६, श्लोक २३) , म्हणजे ‘क्षत्रियाच्या बळाचा धिक्कार असो ! ब्राह्मतेजजन्य बळच खरे बळ आहे.’’ नंतर विश्वामित्र राजाने राज्यकारभाराचा त्याग करून तपश्चर्येला आरंभ केला.’
– (साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, जुलै २०१६)