सेटलवाड आणि श्रीकुमार यांच्यानंतर आता माजी पोलीस अधिकारी संजीव भट्ट यांना अटक !
|
कर्णावती (गुजरात) – वर्ष २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगल प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने बडतर्फ आय.पी.एस्. अधिकारी संजीव भट्ट यांना अटक केली आहे. भट्ट हे गेल्या काही कालावधीपासून अन्य एका प्रकरणात पालनपूर कारागृहात होते. तेथून अहमदाबाद पोलिसांकडे त्यांना सोपवण्यात आले. गुजरातच्या दंगल प्रकरणी निर्दोष व्यक्तींना अडकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ही अटक झाल्याचे सांगण्यात आले. गुजरात दंगल प्रकरणी कथित मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि माजी पोलीस महासंचालक आर्.बी. श्रीकुमार यांना याआधीच अटक करण्यात आली आहे.
१. या दंगलप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष अन्वेषण पथकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ६९ जणांना निर्दाेष घोषित केले होते.
२. या विरोधात सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेलाही न्यायालयाने फेटाळले.
३. त्यानंतर या प्रकरणी सेटलवाड, श्रीकुमार आणि आता भट्ट यांना अटक करण्यात आली आहे.
४. या तिघांवर कलम ४६८ (फसवणूक करण्याच्या उद्देशाने खोटेपणा करणे), कलम ४७१ (जाणीवपूर्वक खोटी कागदपत्रे सिद्ध करणे), कलम १९४ (खोटे पुरावे देणे किंवा बनवणे) आदी कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.