नाशिक येथील गोदावरी नदीला महापूर
-
५ पूल पाण्याखाली
-
गुरुपौर्णिमा कार्यक्रमासाठी केली भाविकांना प्रवेशबंदी !
नाशिक – जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आला आहे. अत्यंत धोक्याच्या पातळीवरून नदीपात्रातून जायकवाडी धरणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे नगरला जोडणार्या ७ पैकी ५ वाहतूक संपर्क पूल पाण्यात बुडाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने वाहनधारकांसाठी या मार्गावरून वाहतूक व्यवस्था बंद केली आहे. येथे लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थितीत असतात; मात्र वांजरगाव येथून सराला बेटाला जोडणार्या संपर्क पुलापर्यंत पुराचे पाणी आले. यामुळे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांनी सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांची भेट घेऊन बेटावरील गुरुपौर्णिमा कार्यक्रमात भाविकांना प्रवेश देऊ नये, अशी विनंती केली होती. त्याप्रमाणे रामगिरी महाराजांनी ‘गुरुपौर्णिमा कार्यक्रमात भाविकांनी येऊ नये’, असे आवाहन केले होते.