महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे १६ जणांचे बळी
५ जिल्ह्यांना अतीदक्षतेची चेतावणी !
संभाजीनगर – नागपूर जिल्ह्यात सावनेर तालुक्यात पुलावरून पाणी वहात असतांनाही चालकाने गाडी पुलावर घातल्याने मध्यप्रदेशातील एकाच कुटुंबातील ६ जण वाहून गेले. नाशिक जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये एका ६ वर्षांच्या चिमुकलीसह ५ जण, तर नंदुरबार जिल्ह्यात २ महिला वाहून गेल्या आहेत. गेल्या २४ घंट्यांत पावसामुळे मुंबई उपनगर येथे २, तर गडचिरोली येथे १ बळी गेला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठांतर्गत विविध परीक्षा पुढे ढकलल्या. पालघर, रायगड, नाशिक, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांत ‘रेड अलर्ट’ची चेतावणी हवामान विभागाने दिली आहे. धुळे, जळगाव, नगर, संभाजीनगर, जालना, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ घोषित केला आहे.