आर्यन खान याला पारपत्र परत देण्याचे मुंबई सत्र न्यायालयाचे निर्देश !
मुंबई – नार्काेटिक्स कंट्रोल ब्युरोने (अंमली पदार्थ विरोधी पथकाने) जप्त केलेले पारपत्र (पासपोर्ट) हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला परत देण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत. आर्यनने ३० जून या दिवशी विशेष एन्.डी.पी.एस्. न्यायालयात पारपत्र परत मिळण्यासाठी याचिका प्रविष्ट केली.
Mumbai: Court allows Aryan Khan’s plea seeking return of his passport The NCB let off Aryan Khan and five others due to “lack of sufficient evidence” #Latest News by #BusinessStandard https://t.co/NOpzLaF9Mf
— Market’s Cafe (@MarketsCafe) July 13, 2022
या प्रकरणी न्यायालयाने एन्.सी.बी.ला उत्तर देण्याचे निर्देश दिले. याची सुनावणी १३ जुलै या दिवशी झाली. त्यानुसार न्यायालयाने वरील निर्देश दिले. त्याप्रमाणे आर्यनला आता त्याचे पारपत्र परत मिळाले आहे.