चिनी आस्थापन ‘ओप्पो’कडून ४ सहस्र ३८९ कोटी रुपयांची करचोरी !

नवी देहली – महसूल गुप्तचर संचालनालयाने (‘डी.आर्.आय.’ने) भ्रमणभाष निर्मिती करणारे चिनी आस्थापन ‘ओप्पो’वर ४ सहस्र ३८९ कोटी रुपयांच्या सीमा शुल्काची चोरी केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी आस्थापनाला नोटीस बजावण्यात आली आहे. यापूर्वी चिनी आस्थापन ‘शाओमी’ आणि ‘विवो’ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

‘डी.आर्.आय.’ने ओप्पोच्या काही कार्यालयांवर आणि काही अधिकार्‍यांच्या घरांवर धाडी टाकल्या आहेत. या आस्थापनाने भ्रमणभाष निर्मितीच्या संदर्भात निर्यातीची योग्य माहिती दिलेली नाही. या प्रकरणी या आस्थापनाला २ सहस्र ९८१ कोटी रुपयांच्या करामध्ये सूटही मिळाली आहे.

संपादकीय भूमिका

‘शाओमी’, ‘विवो’नंतर आता ‘ओप्पो’ या चिनी आस्थापनांकडून अशा प्रकारचा गैरव्यवहार झाल्याचे समोर येत आहे. यावरून अशा आस्थापनांना भारतातून हद्दपार करण्याची आवश्यकता आहे, हे लक्षात येते !