खर्या गुरूंची लक्षणे
‘जो सत्कुलात जन्माला आला आहे, सदाचारी आहे, शुद्ध भावना असलेला आहे, इंद्रिये ज्याच्या ताब्यात आहेत, जो सर्व शास्त्रांचे सार जाणणारा आहे, परोपकारी आहे, भगवंताशी नेहमी अनुसंधानित आहे, ज्याची वाणी चैतन्यमय आहे, ज्याच्यात तेज आणि आकर्षणशक्ती आहे, जो शांत असतो; वेद, वेदार्थाचा पारदर्शी आहे; योगमार्गात ज्याची प्रगती आहे; ज्याचे हृदय ईश्वराप्रमाणे आहे (त्याचे कार्य ईश्वरेच्छेने होते), अशा प्रकारचे गुण ज्याच्यामध्ये आहेत, तोच शास्त्रसंमत गुरु होण्यासाठी योग्य आहे. असे गुरुच दीक्षित शिष्याचेच नव्हे, तर सर्व जगाचे हित साधू शकतात.’
(संदर्भ : शारदातिलक)
– (परात्पर गुरु) कै. परशराम पांडे महाराज (३०.६.२०१८)