झांसी (उत्तरप्रदेश) येथे दानिश खानकडून एका मुलीवर आक्रमण !
गेली २ वर्षे देत होता त्रास !
झांशी (उत्तरप्रदेश) – येथे १२ वी इयत्तेत शिकणार्या एका मुलीवर ११ जुलै या दिवशी दानिश खान नावाच्या युवकाने चाकूने आक्रमण केले. यावेळी अन्य एका मुलीने तिचा जीव वाचवला. मुलीला रुग्णालयात भरती केले असून तिच्या चेहर्यावर ३१ टाके पडले आहेत. पोलिसांनी दानिश आणि अन्य ६ जण यांना अटक केली आहे.
यूपी के झाँसी में हिन्दू छात्रा पर दानिश खान ने चाकू से हमला किया घटना (11 जुलाई 2022) की है।
12वीं में पढ़ने वाली छात्रा पर तब हमला किया गया, जब वह मिशन चौराहे से गुजर रही थी, गंभीर हालत में लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेज रेफर किया गया छात्रा के चेहरे पर 31 टाँके आये हैं, pic.twitter.com/UibP3SGm6B
— रणबीर सिंह नेगी (@RanveerNegi19) July 12, 2022
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांची २ वर्षांपूर्वी ओळख झाली. त्यानंतर दानिशने युवतीला धमकवायला आरंभ केला आणि तिच्याकडून पैसे, तसेच दागिने घेऊ लागला. काही मासांपूर्वी युवतीच्या कुटुंबियांना हे समजल्यावर त्यांनी दानिश याच्या घरी जाऊन कुटुंबियांकडे त्याची तक्रार केली. त्याच्या कुटुंबियांनी यासाठी क्षमाही मागितली; परंतु ११ जुलैला दानिशने युवतीवर आक्रमण केले. घटनेचे पुढील अन्वेषण करण्यात येत आहे.
संपादकीय भूमिकाअल्पसंख्य असलेले गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! |