सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवाला उपस्थित रहाण्याचे मुख्यमंत्री श्री. बसवराज बोम्माई यांना निमंत्रण !

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

बेंगळुरू (कर्नाटक) – सनातन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाला उपस्थित रहाण्याचे निमंत्रण कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री. बसवराज बोम्माई यांना देण्यात आले. सनातन संस्थेच्या सौ. वनजा यांनी मुख्यमंत्री श्री. बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन त्यांना हे निमंत्रण दिले. या वेळी सौ. वनजा यांनी मुख्यमंत्र्यांना निमंत्रणपत्रिका आणि कन्नड साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा गुरुपौर्णिमा विशेषांक देऊन गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. ते मुख्यमंत्र्यांनी अत्यंत जिज्ञासेने आणि मनापासून ऐकले. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा आणि समितीच्या सौ. भव्या गौडा उपस्थित होत्या.