गुरूंचे माहात्म्य अन् शिष्याची गुरुभक्ती
शिष्याची गुरूंविषयी भक्ती दृढ करणारी सनातनची ग्रंथमालिका !
प्रस्तुत ग्रंथमालिकेत गुरु आणि त्यांची शिकवण यांचे नाना पैलू वर्णन केले आहेत. त्यामुळे शिष्याला गुरूंच्या अंतरंगाचे खरे दर्शन घडेल. यामुळे शिष्याची गुरूंविषयीची भक्ती दृढ होईल, ‘चांगला शिष्य होण्यासाठी काय करावे’, हे त्याला कळेल आणि त्याला गुरूंचा अधिकाधिक लाभ करून घेता येईल.
गुरूंचे महत्त्व
‘पित्यापेक्षाही गुरु श्रेष्ठ का आहेत ? गुरूंमुळे संकटांचे निवारण कसे होते? गुरूंच्या अस्तित्वाने शिष्याची आध्यात्मिक उन्नती कशी होते ? साधकावर गुरुकृपा टप्प्याटप्प्याने कशी होते ?’ इत्यादी प्रश्नांची उकल करून गुरूंचे महत्त्व सांगणारा ग्रंथ !
गुरूंचे शिष्यांना शिकवणे आणि गुरु-शिष्य संबंध
प्रस्तुत ग्रंथात गुरूंनी शिष्यांना शिकवण्याच्या विविध पद्धती उदाहरणांसहित दिल्या आहेत. त्यामुळे ‘गुरूंकडून वेगवेगळ्या अंगांनी कसे शिकावे ?’, याची एक नवी दृष्टी शिष्यांमध्ये विकसित होईल.
गुरूंचे प्रकार आणि गुरुमंत्र
‘गुरु, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांतील भेद कोणता ? भोंदू गुरु होण्यात धोका कोणता ? ढोंगी गुरूंविषयी संतांनी काय करावे ? गुरुमंत्र म्हणजे काय ? ‘गुरुमंत्र गुप्त ठेवावा’, असे का म्हणतात ? आदी प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात दिली आहेत.
गुरूंचे वागणे, कार्य आणि गुरुपरंपरा
शिक्षक, देवता आणि गुरु यांतील भेद कोणता ? गुरूंची इतर गुरूंशी तुलना का करू नये ? गुरु त्यांच्यानंतर गुरुपदावर कुणाला बसवतात ? आदी प्रश्नांची उत्तरे देऊन जिज्ञासू आणि साधक यांचा साधनाप्रवास वेगाने होण्यास साहाय्य करणारा ग्रंथ !
‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.comसंपर्क : ९३२२३१५३१७ |