मुंबईतील अल्पवयीन हिंदु मुलीला ठार मारण्याची धमकी देणार्या काश्मीर येथील धर्मांधाला अटक
मुंबई – कन्हैयालाल यांच्या हत्येच्या विरोधात ‘फेसबूक’ पोस्ट करणार्या गिरगाव येथील अल्पवयीन हिंदु मुलीला जिवे मारण्याची धमकी देणार्या धर्मांधाला मुंबई पोलिसांनी काश्मीर येथून अटक केली. फैयाज अहमद भट असे आरोपीचे नाव असून न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
फैयाज याने १ जुलै या दिवशी हिंदु युवतीला ठार मारण्याची धमकी दिली, तसेच घाणेरड्या शिव्या दिल्या, तसेच रात्री ‘व्हॉट्सअॅप’वर संदेश पाठवून आणि दूरभाष करून धमक्या दिल्या. या विरोधात मुलीच्या वडीलांनी वल्लभभाई पटेल पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानंतर धमकी देणार्याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक जम्मू-काश्मीर येथे गेले होते. स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने ९ जुलै या दिवशी पोलिसांनी फैयाज याला अटक केली. ११ जुलै या दिवशी पोलिसांनी त्याला न्यायालयात उपस्थित केले होते.