अमरावती येथील अब्दुल नदीम अब्दुल मजीद याच्याविरुद्ध ‘एम्.पी.डी.ए.’ची कारवाई !
अमरावती – गेल्या ८ वर्षांत विविध प्रकारचे ११ गुन्हे नोंद असलेला अब्दुल नदीम अब्दुल मजीद उपाख्य नदीम अंधा याच्याविरुद्ध पोलिसांनी ‘महाराष्ट्र झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्या’नुसार (एम्.पी.डी.ए.) कारवाई केली आहे. येथील पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी अब्दुल नदीम अब्दुल मजीद याच्या स्थानबद्धतेचे आदेश काढले. आदेश बजावून नागपुरी गेट पोलिसांनी अब्दुल नदीम अब्दुल मजीद याला येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे ९ जुलै या दिवशी स्थानबद्ध केले.
संपादकीय भूमिका
स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! |