कोल्हापूर जिल्ह्यात २ दिवसांपासून संततधार पावसाने पंचगंगा ३२ फुटांवर !

पंचगंगा नदी

कोल्हापूर, ११ जुलै (वार्ता.) – गेले २ दिवस चालू असलेल्या संततधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणीची पातळी ३२ फूट ७ इंच इतकी झाली आहे. राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून धरण ५७.६७ टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून १ सहस्र ३५० घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग चालू आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना परत एकदा सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. सातारा-कोल्हापूर जिल्ह्यात हवामान विभागाने परत एकदा १४ जुलैअखेर मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.