लेस्टर, इंग्लंड येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे आधुनिक वैद्य मिलिंद खरे यांना नवरात्रीनिमित्त झालेले विशेष भक्तीसत्संग ऐकतांना आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
नवरात्रीनिमित्त झालेले भक्तीसत्संग ऐकतांना ‘देवीमाता सहस्रारचक्रात प्रवेश करून हृदयात स्थानापन्न झाल्या आहेत आणि त्याच शक्ती प्रदान करून साधना अन् सेवा करवून घेत आहेत’, असे जाणवणे : ७ ते १५.१०.२०२१ या नवरात्रीच्या ९ दिवसांच्या कालावधीत झालेले भक्तीसत्संग पुष्कळ चैतन्यदायी आणि शक्तीदायी होते. पहिल्या दिवशी मी डोळे मिटून भक्तीसत्संग ऐकत होतो. तेव्हा मला जाणवले, ‘कुणीतरी माझ्या डोक्यावरील केस बाजूला करून माझ्या सहस्रारचक्राच्या ठिकाणी एक विवर सिद्ध केले. त्या विवरातून श्री दुर्गादेवीने सिंहासह माझ्या देहात प्रवेश केला असून ती माझ्या हृदयमंदिरात स्थानापन्न झाली. त्यानंतर श्री कालीमाता, श्री पार्वती आणि श्री महालक्ष्मीदेवी यांनीही त्या विवरातून माझ्या देहात प्रवेश केला असून त्या माझ्या हृदयमंदिरात स्थानापन्न झाल्या आहेत. या देवीच मला शक्ती प्रदान करत आहेत आणि माझ्याकडून सेवा अन् साधना करवून घेत आहेत.’
‘भक्तीसत्संगामुळे मी ही अनुभूती घेऊ शकलो’, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !
– आधुनिक वैद्य मिलिंद खरे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), लेस्टर, इंग्लंड. (१६.१२.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |