(म्हणे) ‘नसरूद्दीनला अंडे लागले !’
नूरपूर येथे धर्मांधांनी हिंदूंच्या वरातीवर अंडी फेकल्यावरून अलीगड (उत्तरप्रदेश) पोलिसांचे स्पष्टीकरण
अलीगड (उत्तरप्रदेश) – येथील नूरपूर गावात दोघा हिंदु तरुणींची वरात मशिदीच्या जवळून जात असतांना धर्मांधांच्या घरांवरून त्यावर अंडी फेकण्यात आल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या ट्विटर खात्यावरून या घटनेची माहिती देणारे ट्वीट करण्यात आले. त्यावर अलीगड पोलिसांनी ट्वीट करून स्पष्टीकरण दिले आहे. यात म्हटले आहे, ‘नसरूद्दीन नावाच्या व्यक्तीला अंडे लागले होते. तो वरातीच्या बाजूने चालला होता. घटनेचे अन्वेषण करण्यासाठी ‘सीसीटीव्ही फुटेज्’ पडताळण्यात आले. वरात शांततापूर्ण वातावरणात पार पडली. घटनेसंबंधी गुन्हा नोंदवण्यात आला असून गावात पूर्ण शांतता आहे.’
अजरुदीन पुत्र नसरुद्दीन नामक व्यक्ति को अंडा लगा था जो बारात के बगल से गुजर रहा था, तस्दीक करने के लिए CCTV खंगाले गए, प्रकरण कई दिन पुराना है जिसमें बारात शांतिपूर्ण सकुशल संपन्न हुई व मुकद्दमा दर्ज कर विवेचना प्रचलित है, गांव में पूर्ण शांति है ।
— ALIGARH POLICE (@aligarhpolice) July 10, 2022
संपादकीय भूमिकामुळात हिंदूंच्या वरातीवर धर्मांधांनी अंडी फेकणे, हे गंभीर असून त्या विरोधात कृती करण्याऐवजी ‘एका मुसलमानाला अंडे लागले’, असे म्हणणे म्हणजे धर्मांधांना पाठीशी घालण्यासारखेच नव्हे का ? |