‘गाना’ आणि ‘हंगामा’ आस्थापनांनी ‘सर तन से जुदा’ गाणे हटवले !
|
मुंबई – गाण्यांचा संग्रह असणार्या ‘टाइम्स ग्रुप’च्या प्रसिद्ध ‘गाना’ आस्थापनाने त्याच्या संकेतस्थळावरील आणि ॲपवरील ‘‘गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा’ (महंमद पैगंबर यांच्या अवमानाची एकच शिक्षा, शिरच्छेद !) हे गाणे हिंदूंच्या विरोधानंतर हटवले. त्याच्यासह ‘हंगामा’ या आस्थापनानेही हे गाणे त्याच्या ॲपवरून हटवले. ‘..सर तन से जुदा’ हे गाणे पाकिस्तानी गायकाने गायलेले आहे. नूपुर शर्मा यांच्या प्रकरणानंतर या गाण्याचे बोल भारतातील धर्मांध हिंदूंच्या हत्या करण्यासाठी वापरत आहेत. उदयपूर येथे कन्हैयालाल यांची हत्या याच घोषणेच्या नावाखाली झाली होती. हिंदु जनजागृती समितीने हे गाणे हटवण्यासाठी ऑनलाईन अभियान राबवले होते. ट्विटरवर ‘#Boycott_GaanaApp’ हा ‘हॅशटॅग’ही (एकाच विषयावर घडवून आणलेली चर्चा) ‘ट्रेंड’ (चर्चित विषय) झाला होता. हा ट्रेंड राष्ट्रीय स्तरावरील ‘ट्रेंड्स’मध्ये ५ व्या क्रमांकावर आला होता. या ट्रेंडवर ट्वीट करतांना अनेक धर्मप्रेमींनी अन्य ॲप्सवरून अशा प्रकारचे गाणे हटवण्याची मागणी केली. हे गाणे अद्यापही ‘स्पॉटिफाय’, ‘यू-ट्यूब म्युझिक’, ‘विंक’ आणि ‘ॲपल म्युझिक’ या ॲप्सवर उपलब्ध आहे.