मुंबईतील साखळी बाँबस्फोटातील दोषींच्या फाशीच्या शिक्षेवरील निर्णय १६ वर्षांनंतरही प्रलंबित !
मुंबई – पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलमध्ये ११ जुलै २००६ या दिवशी झालेल्या साखळी बाँबस्फोटाला १६ वर्षे झाली आहेत. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने १३ दोषींपैकी ५ जणांना फाशीची शिक्षा दिली आहे; मात्र मुंबई उच्च न्यायालयात अद्याप या शिक्षेवरील निर्णय घेण्यात आलेला नाही.
१. ११ जुलै या दिवशी हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आले. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आखणी काही मास लागण्याची शक्यता आहे.
२. मुंबई सत्र न्यायालयाने दोषींना फाशीची शिक्षा दिल्यानंतर वर्ष २०१५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आले. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन करण्याची मागणी तत्कालीन मुख्य न्यायमूर्तींकडे करण्यात आली होती. ही मागणी मान्य करण्यात आली; मात्र ३ वेळा न्यायमूर्ती निवृत्त झाल्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही.
३. सत्र न्यायालयाने कमाल अहमद अंसारी, महंमद फैजल शेख, एहत्तेशाम सिद्दीकी, नावेद हुसेन खान आणि आसिफ खान यांना फाशीची शिक्षा सुनावली, तर तन्वीर अहमद अंसारी, महंमद माजिद शफी, शेख आलम शेख, महंमद साजिद अंसारी, मुझम्मील शेख, सोहेल शेख आणि जमीर शेख यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
४. फाशीची शिक्षा सुनावलेल्या कमल अन्सारी याचा कोरोनाच्या कालावधीत कोठडीतच मृत्यू झाला. आतंकवाद्यांनी लोकलमधील पहिल्या श्रेणीच्या डब्यांमध्ये ‘टाईम बाँब’ ठेवून हे बाँबस्फोट केले होते. यामध्ये ११ मिनिटांत लोकलमध्ये ७ बाँबस्फोट झाले. यामध्ये २०९ नागरिकांचा मृत्यू झाला.
संपादकीय भूमिकासाखळी बाँबस्फोट प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर शासन व्हावे, ही जनतेची अपेक्षा ! |