तमिळनाडूतील अखिल भारतीय अण्णाद्रमुक पक्षात फूट
पक्षाच्या कार्यालयातच २ गटांत हाणामारी
चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूतील अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम् (अखिल भारतीय अण्णा द्रविड प्रगती संघ) या पक्षाच्या अध्यक्षपदावरून ओ. पनीरसेल्वम् आणि के. पलानीस्वामी यांच्या गटांत चढाओढ चालू आहे. ओ. पनीरसेल्वम् यांना मद्रास उच्च न्यायालयाने पक्षाच्या भविष्यातील नेतृत्वाची चौकट सिद्ध करण्यासाठी ‘जनरल कौन्सिल’च्या बैठकीला मान्यता दिली आहे. के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून बोलावलेल्या बैठकीला स्थगिती देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. दुसरीकडे चेन्नईत पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम् यांच्या गटांत हाणामारी झाली. त्यात अनेक कार्यकर्ते घायाळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. ‘जनरल कौन्सिल’च्या बैठकीपूर्वी पनीरसेल्वम् यांच्या समर्थकांनी पक्षाच्या कार्यालयाचा दरवाजा तोडला. समर्थक लाठ्या काठ्या घेऊन कार्यालयामध्ये पोचले. त्यांनी घोषणाबाजी केली.